नाशिकसाठी हेमंत गोडसेंना लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
नाशिक लोकसभेच्या जागेवरुन महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु असताना हेमंत गोडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब... नाशिक लोकसभेसाठी गोडसेंना उमेदवारी जाहीर होताच छगन भुजबळ यांना प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ म्हणाले, भारती पवार आणि हेमंत गोडसे यांचा फॉर्म भरण्याचा कार्यक्रम उद्या होईल. देवेंद्र फडणवीस किंवा इतर काही नेते येण्याची शक्यता....
नाशिक लोकसभेची जागा महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाला मिळाली असून हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. नाशिक लोकसभेच्या जागेवरुन महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु असताना हेमंत गोडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. दरम्यान नाशिक लोकसभेसाठी गोडसेंना उमेदवारी जाहीर होताच छगन भुजबळ यांना प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ म्हणाले, भारती पवार आणि हेमंत गोडसे यांचा फॉर्म भरण्याचा कार्यक्रम उद्या होईल. देवेंद्र फडणवीस किंवा इतर काही नेते येण्याची शक्यता आहे. अर्ज भरताना मोठी मिरवणूक निघेल. संपूर्ण नाशिक मतदारसंघातील आणि दिंडोरी मतदार संघातील लोक या रॅलीला येतील. जेवढे महायुतीचे कार्यकर्ते आहेत सर्व एकत्र येतील. मिरवणुकीत सामील होतील, अशी माहितीही भुजबळ यांनी दिली. पुढे भुजबळ असेही म्हणाले की, हेमंत गोडसेंना नाशिक मतदारसंघात प्रत्येकाला माहिती आहे. दहा वर्षाचे खासदार होते. त्यामुळे त्यांचा प्रचार करणे सुद्धा सोपे जाईल. या पंधरा-सोळा दिवसात आम्ही पूर्णपणे ताकतीन प्रचाराचं काम करू. तर नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी हेमंत गोडसे यांना आम्ही नाशिकमधून खासदार करून पाठवू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.