ऐन उन्हाळ्यात हजारो लीटर पाणी वाया, महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड्यावर
VIDEO | नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे कोट्यवधींचा रस्ता पाण्यात...
नाशिक : मालेगाव महापालिका पाणी पुरवठा विभागाचा ढिसाळ कारभार जनतेच्या समोर आला आहे. मालेगाव महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या कारभारामुळे ऐन उन्हाळ्यात सोयगाव ते नामपूर रोडवर दररोज लाखो पाणी दररोज वाया जात असल्याचे समोर आले आहे. तर गेल्या वर्षभरपासून स्थानिकांनी तक्रारी करून देखील अद्याप यावर कोणतीही उपाययोजना केली जात नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. तर उन्हामुळे पाणीबाणी निर्माण झाली तरीही पाणी पुरवठा विभागाचं रस्त्यावर वाया जाणाऱ्या पाण्याकडे दुर्लक्ष होतांना दिसतंय. नुकताच कोट्यवधी रुपये खर्च करून बनवलेल्या रस्त्याच्या मधोमध हे लीकेज असल्याने रस्ता देखील खराब होण्याच्या मार्गावर आहे. तर पाण्यामुळे हा रस्ता खराब झाल्याने मालेगाव पाणी पुरवठा विभागाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होऊ शकते.
Published on: May 03, 2023 02:38 PM
Latest Videos