नाशिककरांनो पाणी जपून वापरा कारण…, पाणीपुरवठा राहणार बंद, कधी आणि कुठं? बघा व्हिडीओ
VIDEO | नाशिक शहरात पाणीपुरवठा बंद, काय आहे कारण? बघा व्हिडीओ, पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचे नाशिककरांना आवाहन
नाशिक : नाशिककरांनो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी. नाशिक शहरात उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नाशिक शहरात महावितरणच्या शटडाऊनमुळे उद्या पाणीपुरवठा बंद केला जाणार असल्याची माहिती मिळतेय. तर रविवारी सकाळी देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. सध्या उन्हाळा सुरू असल्याने पाणी कपात करण्यात आली तर पाण्याचं नियोजन कसं करायचं याबाबतची लिटमस टेस्ट यामधून करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक शहरात उद्या पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महावितरण कंपनी शनिवारी वीज उपकेंद्र आणि मुख्य वीज वाहिन्यांची दुरूस्ती तसेच पावसाळापूर्व कामे करण्यात येणार असल्याने या दिवशी महापालिकेच्या गंगापूर आणि मुकणे धरणातील उपसा केंद्रांचा वीज पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे शनिवारी पूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. तर रविवारी कमी दाहाने, कमी प्रमाणात पाणी पुरवठा होईल, असे पाणी पुरवठा विभागाकडून सांगितले जात आहे.