नाशिककरांसाठी आनंदाची बातमी, आता नाशिकमधून विमानसेवेने ‘ही’ दोन नवी शहरे जोडणार
VIDEO | नाशिकमधून विमानसेवेने ही दोन मोठी नवी शहरे जोडणार, कधीपासून सुरू होणार सेवा?
नाशिक : नाशिककरांसाठी (Nashik News) एक आनंदाची बातमी आहे. इंडिगो कंपनीकडून येत्या १ जूनपासून नियमितपणे नाशिकहून हैदराबाद आणि इंदूरसाठी विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक ओझर विमानतळावरून रखडत असलेल्या विमान सेवेला इंडिगो कंपनीच्या विमानसेळेमुळे नवा बुस्ट मिळाला आहे. या कंपनीमार्फत आता हैदराबाद आणि इंदूर येथे विमानसेवा देण्यात येणार आहे. याशिवाय अहमदाबाद येथूनही ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, इंडिगो कंपनीकडून या विमानसेवेसाठी बुकिंग सुरू करण्यात आले आहे तर आठवड्यातील सर्व दिवस ही विमानसेवा सुरू राहणार आहे. इंडिगो कंपनीकडून विमानसेवेचा विस्तार करताना नाशिक या शहराला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार या दोन नवीन मोठ्या शहराला जोडणाऱ्या विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय इंडिगो विमान कंपनीकडून घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..

गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ

कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट

वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
