बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्प व्हावा, यासाठी पत्र उद्धव ठाकरे यांनीच दिलं होतं; 'या' मंत्र्याचा दावा

बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्प व्हावा, यासाठी पत्र उद्धव ठाकरे यांनीच दिलं होतं; ‘या’ मंत्र्याचा दावा

| Updated on: Apr 25, 2023 | 1:21 PM

Industries Minister Uday Samant on Uddhav Thackeray : रिफायनरी प्रकल्प, उद्धव ठाकरे अन् आरोप; शिवसेनेच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य

नाशिक : बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्पावरून सध्या आंदोलन सुरू आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही आरोप केलाय. बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्प व्हावा यासाठी पत्र उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं, असं उदय सामंत म्हणाले आहेत. हा क्रांतिकारी प्रकल्प आहे. यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळेल. काही लोकांचे मनसुबे धुळीस मिळाल्या मुळे जालियनवाला बाग होईल असं म्हटलं जातंय, असं म्हणत सामंत यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. नानार रद्द करण्यात आम्ही देखील होतो. बारसूमध्ये रिफायनरी व्हावी, हे पत्र उद्धव ठाकरे यांनीच दिलं होतं, असंही सामंत म्हणालेत.

Published on: Apr 25, 2023 01:21 PM