तब्बल 65 फूट खोल विहीर खोदूनही विहिरीला पाणी नाही, शेतकरी हतबल अन् …
VIDEO | दुष्काळग्रस्त नाशिकच्या येवल्यात पाणीटंचाईची झळ, शेतकरी विहीर खोदूनही हतबल अन् पाण्यासाठी वणवण
नाशिक : दुष्काळग्रस्त येवला तालुक्यात पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसत असल्याचे वास्तव समोर आले आहे. येथे शासनाच्या वतीने एकीकडे वीस टँकरद्वारे 43 गावांमध्ये पाणीपुरवठा करून नागरिकांची तहान भागवली जात आहे तर दुसरीकडे शेतकरी आपल्या शेतामध्ये नव्याने विहीर खोदून शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी लगबग सुरु आहे. अंदरसूल गावातील शेतकरी अविनाश गोरख खैरनार यांनी साडेचार लाख रुपये कर्ज काढून नव्याने नऊ परस म्हणजे 65 फूट खोल विहीर केली. इतक्या खोल विहिरीत मजुरांनी आपला जीव धोक्यात घालून काम केले पण या विहिरीला पाणी न लागल्यामुळे शेतकऱ्याचा संपूर्ण खर्च वाया गेल्याने शेतकरी नाराज झाला आणि हतबल झाला आहे. पाणी नसल्याने शेती करावी कशी, नवीन पिक घ्यावे कसे, घेतलेले कर्ज फेडावे कसे असा मोठा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे.
Published on: May 30, 2023 03:14 PM
Latest Videos