VIDEO : Deepak Pandey | देवेंद्र फडणवीसांना कायद्याचं चांगलं ज्ञान, पण मी आदेशावर ठाम : दीपक पांडे

VIDEO : Deepak Pandey | देवेंद्र फडणवीसांना कायद्याचं चांगलं ज्ञान, पण मी आदेशावर ठाम : दीपक पांडे

| Updated on: Aug 25, 2021 | 2:05 PM

माजी मुख्यमंत्री साहेब ते खूप सुज्ञान आहेत, त्यांचा कायद्याचा अभ्यास आहे, त्यांना काही चॅलेंज नाही. माझं थोडं ज्ञान आहे, माझी शिकवण आहे, त्यानुसार आदेश काढला, तर तो चुकीचा असेल, संविधानाच्या 236, 237 खाली न्यायालयात जाऊन क्रॉस करु शकतात. मी माझ्या आदेशावर ठाम आहे, न्यायसंगत आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्यानंतर नाशिकमध्ये त्यांच्याविरोधात पहिला गुन्हा नोंद झाला आणि थेट अटकेचा आदेश निघाला. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट नाशिक पोलीस आयुक्तांना सूचक इशारा देत ते छत्रपती आहेत का? असा सवाल केला. यावर आता नाशिकचे पोलीस आयुक्त दीपककुमार यांनी प्रत्युत्तर दिलंय. दीपक कुमार म्हणाले, “माजी मुख्यमंत्री साहेब ते खूप सुज्ञान आहेत, त्यांचा कायद्याचा अभ्यास आहे, त्यांना काही चॅलेंज नाही. माझं थोडं ज्ञान आहे, माझी शिकवण आहे, त्यानुसार आदेश काढला, तर तो चुकीचा असेल, संविधानाच्या 236, 237 खाली न्यायालयात जाऊन क्रॉस करु शकतात. मी माझ्या आदेशावर ठाम आहे, न्यायसंगत आहे.