Nashik पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांचा महसूल अधिकाऱ्यांवर ‘लेटरबॉम्ब’
महसूल अधिकार हे आरडीएक्स (RD X) सारखे आहेत, आणि कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिकार हे डीटोनटर (Detonator) सारखे आहेत. आरडीएक्स + डीटोनेटर ( RDX + Detonator) मिळून हा एक जीवंत बॉम्ब (Active Bomb) बनतो, जे भूमाफिया त्यांचे मर्जी प्रमाणे वापरतात, असं दीपक पांडेय म्हणाले आहे.
नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी महसूल अधिकाऱ्यांच्या अधिकारांवर आणि भूमाफियांवर लेटरबॉम्ब टाकला आहे. दीपक पांडेय यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडेय यांना पत्र लिहिलं आहे. भूमाफियांची गुन्हा करण्याची कार्यपध्दती अशी आहे की, कुठल्याही जमिनीबाबत एखाद्या व्यक्तीने महसूल विभागात दावा दाखल केला तर महसूल अधिका-याच्या महसूल कायद्यासंदर्भात अधिकार व फौजदारी प्रक्रिया संहिताअंतर्गत कार्यकारी दंडाधिका-याचे अधिकार याच्यामध्ये भूमाफिया त्यांना अडकवतो. असा अडकलेला जमीन मालक ब-याच परिस्थितीमध्ये अशी जमीन तणावाखाली इच्छेविरुध्द भूमाफिया यांना कमी दराने विक्री करतो किंवा जमीन मालकाला अडचणीत आणून भूमाफिया जमीन हिसकावून घेतो. आणि विशेष परिस्थितीत भूमाफियांकडून जमीन मालकाचा खून करुन जमिनी हडप केल्या जातात, असं दीपक पांडेय म्हणाले आहेत. महसूल विभागाकडे महसूल कायद्यांतर्गत जमिनीबाबतचे अधिकार व फौजदारी प्रक्रिया संहिता अंतर्गत कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिकार हे दोन्ही अधिकार प्राप्त असल्यामुळे भूमाफियांकडून जमीन हडपण्यासाठी “विस्फोटक सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. महसूल अधिकार हे आरडीएक्स (RD X) सारखे आहेत, आणि कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिकार हे डीटोनटर (Detonator) सारखे आहेत. आरडीएक्स + डीटोनेटर ( RDX + Detonator) मिळून हा एक जीवंत बॉम्ब (Active Bomb) बनतो, जे भूमाफिया त्यांचे मर्जी प्रमाणे वापरतात, असं दीपक पांडेय म्हणाले आहे.