नाशिकमध्ये 'नो हेल्मेट नो पेट्रोल' मोहीम, पोलीस आयुक्तांच्या पंप चालकांना सूचना

नाशिकमध्ये ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ मोहीम, पोलीस आयुक्तांच्या पंप चालकांना सूचना

| Updated on: Aug 01, 2021 | 9:51 AM

सर्व पेट्रोल पंप चालकांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत, की एखाद्या दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले नसेल, तर त्याला इंधन देऊ नये. त्यामुळे पोलिस आयुक्तांच्या आवाहनाला बाईकस्वार कसे प्रतिसाद देणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे

नाशिक शहरात 15 ऑगस्ट पासून नो हेल्मेट, नो पट्रोल मोहीम राबवण्यात येणार आहे. नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दुचाकी चालकांना हेल्मेट घालण्याचे आवाहन केले आहे. दुचाकीवरील होणाऱ्या अपघातांची संख्या, त्यात हेल्मेटची गरज लक्षात घेता आयुक्तांचा निर्णय घेतला आहे. सर्व पेट्रोल पंप चालकांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत, की एखाद्या दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले नसेल, तर त्याला इंधन देऊ नये. त्यामुळे पोलिस आयुक्तांच्या आवाहनाला बाईकस्वार कसे प्रतिसाद देणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे