संजय राऊतांचा नाशिक दौरा, भाजपची जनआशीर्वाद यात्रा, पोलिसांचा शिवसेना कार्यालयाला तगडा बंदोबस्त
राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये तणावाचं वातावरण असताना खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. संजय राऊत अचानक नाशिकला येत असल्यानं शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं.
राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये तणावाचं वातावरण असताना खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. संजय राऊत अचानक नाशिकला येत असल्यानं शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं. संजय राऊत यांचा दौरा आणि भाजपची जनआशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना कार्यालयाबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते नारायण राणेंना करण्यात आलेल्या अटकेवरून बोचरी टीका केली आहे. फार बोलत नाही पुढल्या कार्यक्रमाला जायचं आहे. अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करून दाखवू. आपल्याला कार्यक्रम करण्याची सवय आहे. कार्यक्रम केल्यावर परिणामाची चर्चा कधीही करत नाही, असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं आहे.
Latest Videos