नाशिककरांना जोरदार पावसाची प्रतिक्षा, तरीही रिमझिम पावसाकडून आनंदाची बातमी
VIDEO | नाशिकात जोरदार पावसाची प्रतीक्षा, तरीही जिल्ह्यात आणि धरण पाणलोट क्षेत्रात रिमझिम सुरू
नाशिक, २८ जुलै २०२३ | नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाची पाणी पातळी 68 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. गंगापूर धरण 68 टक्क्यांपर्यंत भरलं असल्याने नाशिककरांसाठी ही दिलासादायक बाब आहे. नाशिक जिल्ह्यात अद्याप अपेक्षित असलेला पाऊस पडला नसला तरी सध्य स्थितीला होणाऱ्या रिमझिम पावासामुळे गंगापूर धरण 68 टक्के भरले आहे. दरम्यान, नाशिकमध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा असली तरी जिल्ह्यात आणि खास करून धरण पाणलोट क्षेत्रात रिमझिम सुरू आहे. या रिमझिम पावसामुळे गंगापूर धरणातील पाण्याची पातळी हळूहळू का होईना पण वाढत असल्याचं बघायला मिळतंय. दरम्यान पुढच्या काही दिवसात नाशिकमध्ये जोरदार पाऊस झाल्यास गंगापूर धरण 100 टक्के भरेल याची प्रतीक्षा आहे. राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून दमदार पावसानं हजेरी लावली आहे. मात्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात अद्याप रिमझिम पावसाच्या सरी बसताना दिसताय. मात्र येत्या काही दिवसात नाशिकमध्ये जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.