Nashik Someshwar Waterfall | नाशिकमधील सोमेश्वर धबधबा प्रवाहित

Nashik Someshwar Waterfall | नाशिकमधील सोमेश्वर धबधबा प्रवाहित

| Updated on: Sep 14, 2021 | 10:00 AM

सुट्टीच्या दिवशी अनेक नाशिककरांनी सोमेश्वर धबधब्यावर प्रचंड गर्दी केल्याचे बघायला मिळालं होतं. विशेष म्हणजे पर्यटकांच्या या गर्दीकडे नाशिक पोलिसांचं अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचं बघायला मिळत आहे

नाशिकमध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. परिणामी नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने सोमेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेने वाहतो आहे. या धबधब्याचा विलोभनीय नजारा खास टीव्ही9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी सादर केला आहे.

दरम्यान, कोरोना संदर्भातल्या नियमांना नाशिककर केराची टोपली दाखवत असल्याचं नाशिक शहरात पुन्हा एकदा बघायला मिळाल. गेल्या रविवारी सुट्टीच्या दिवशी अनेक नाशिककरांनी सोमेश्वर धबधब्यावर प्रचंड गर्दी केल्याचे बघायला मिळालं होतं. विशेष म्हणजे पर्यटकांच्या या गर्दीकडे नाशिक पोलिसांचं अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचं बघायला मिळत असून यामुळे शहरात कोरोना वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान पर्यटकांच्या गर्दीबाबत वारंवार पालकमंत्र्यांकडून सूचना होऊनदेखील पोलिसांकडून मात्र याबाबत कठोर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.