नाशिकच्या लाचखोर तहसीलदाराच्या घरात मोठं घबाड, ४० तोळं सोनं अन् इतकी सापडली रोकड
VIDEO | नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई, १५ लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं अन् घर झडतीत सापडलं मोठं घबाड, किती सापडली रोकड?
नाशिक, 6 ऑगस्ट 2023 | नाशिकचे तहसीलदार नरेश बहिरम यांना तब्बल 15 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. नरेश बहिरम यांची नुकतीच 14 एप्रिल 2023 ला नाशिकला तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर अवघ्या चार महिन्यांत ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. नाशिक शहरातील बहिरम यांच्या कर्मयोगी नगर येथील निवासस्थाना जवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत ही कारवाई केली. गौण खनिज प्रकरणातील दंडाची रक्कम कमी करण्यासाठी बहिरम यांनी लाच मागितली होती. एसीबीच्या पथकाकडून रात्री उशिरापर्यंत बहिरम यांच्या घराची झडती घेण्यात आली. यात 4 लाख 80 हजार रुपयांची रोकड आणि 40 तोळे सोने (अंदाजे 20 लाख रुपये) आढळून आल्याची माहिती मिळालीय. नरेश बहिरम यांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आज बहिरम यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. न्यायालय काय निर्णय देणार, हे बघणे महत्त्वाचे आहे.