आता प्लास्टिकपासून तयार होणार इंधन, राज्यात कुठं होणार प्लास्टिकवर प्रक्रिया?
VIDEO | राज्यातील या जिल्ह्यात वेस्ट मॅनेजमेंट केंद्रात आता प्लास्टिकपासून इंधन तयार होणार, प्रकल्पात पाच लीटर प्रतिदिन क्षमतेच्या 'प्लास्टिक टू फुएल' या संयंत्राची उभारणी
नाशिक : नाशिककरांसाठी एक मोठी बातमी आहे. कारण नाशिकमध्ये आता प्लास्टिकपासून इंधन तयार केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. नाशिकच्या वेस्ट मॅनेजमेंट केंद्रात आता प्लास्टिकपासून इंधन तयार होणार आहे. या प्रकल्पात पाच लीटर प्रतिदिन क्षमतेच्या ‘प्लास्टिक टू फुएल’ या संयंत्राची उभारणी करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते हे दोन्ही संयंत्र कार्यान्वित करण्यात आले. याठिकाणी कचऱ्याचे चांगल्या पद्धतीने वर्गीकरण करण्यासाठी 250 मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेचा बॅलेस्टिक सेप्रेटर संच देखील उभारण्यात आला आहे. यातून सुक्या कचऱ्याचे दोन ते तीन प्रकारात वर्गीकरण केले जाणार असून, उच्च प्रतीचे आरडीएफ तयार करणे शक्य होणार आहे. त्यामुळे प्लास्टिकपासून इंधन तयार केल्यानं योग्यरित्या प्लास्टिकचे विघटन होणार असून नागरिकांना त्याचा फायदा होताना दिसणार आहे.