Nashik | नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षक अधिकारी वैशाली झनकर यांच्यावर निलंबनाची कारवाई

Nashik | नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षक अधिकारी वैशाली झनकर यांच्यावर निलंबनाची कारवाई

| Updated on: Aug 23, 2021 | 11:08 PM

वैशाली वीर-झनकर यांचं निलंबन करण्यात यावं असा प्रस्ताव यापूर्वी 3 वेळा पाठवण्यात आला होता. त्यानंतर आज मात्र त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. शासनाच्या कायद्यानुसार झनकर यांना निलंबित करण्यात आलं आहे. 8 लाखाची लाच स्वीकारल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबनाच्या या कारवाईमुळे वैशाली वीर-झनकर यांना मोठा धक्का बसला आहे. 

आठ लाखाच्या लाचखोरी प्रकरणात अखेर शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर यांचं निलंबन करण्यात आलं आहे. वैशाली यांना आजच अटी-शर्तींसह जामीन मंजूर करण्यात आलाय. त्यानुसार वैशाली यांना दर सोमवारी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात चौकशीसाठी हजेरी लावावी लागणार आहे. या प्रकरणी कोर्टात सध्या खटला सुरु आहे. वैशाली यांच्या वकिलांनी 14 ऑगस्टला देखील जामीन अर्ज केला होता. पण त्यावेळी कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. दरम्यान, वैशाली वीर-झनकर यांचं निलंबन करण्यात यावं असा प्रस्ताव यापूर्वी 3 वेळा पाठवण्यात आला होता. त्यानंतर आज मात्र त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. शासनाच्या कायद्यानुसार झनकर यांना निलंबित करण्यात आलं आहे. 8 लाखाची लाच स्वीकारल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबनाच्या या कारवाईमुळे वैशाली वीर-झनकर यांना मोठा धक्का बसला आहे.