धक्कादायक; राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदाराचं पेट्रोल पंप, संपर्क कार्यालय फोडलं
यानंतर त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीतील ३० हून आमदार गेले आहेत. त्यात नाशिकच्या कळवण तालुक्याचे आमदार नितीन पवार यांचा देखील समावेश आहे. मात्र त्यांच्याबाबत आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
नाशिक, 29 जुलै 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादीतील आमदार फोडले. तर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीतील ३० हून आमदार गेले आहेत. त्यात नाशिकच्या सुरगाण्याचे आमदार नितीन पवार यांचा देखील समावेश आहे. मात्र त्यांच्याबाबत आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पवार यांच्या पेट्रोल पंप व संपर्क कार्यालयावर हल्ला करून ते फोडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. आमदार पवार यांचे मानूर शिवारात पेट्रोल पंप तसेच संपर्क कार्यालय आहे. त्याची पहाटे पहाटे काही अज्ञातांनी तोडफोड केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याची नोंद पोलीसांत झाली आहे. तर पोलीस याचा तपास करत आहेत.
Published on: Jul 29, 2023 11:32 AM
Latest Videos