‘एकनाथ शिंदे फक्त मुखवटा, राज्य देवेंद्र फडणवीसच करतायेत’

| Updated on: Mar 28, 2023 | 9:58 PM

VIDEO | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस सरकारचं कुणी दाखवलं अपयश?

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एक व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे वाचून दाखवू का असं विचारत आहेत आणि त्यावर देवेंद्र फडणवीस त्यांना सांगत आहेत की, वाचून दाखवायची काय गरज नाही. या एकनाथ शिंदे यांच्या व्हिडीओवरून चर्चांना एकच उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी जयंत पाटील म्हणाले, ज्या अर्थी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना हे लिहिलेलं वाचून दाखवू का असं जर विचारत असतील तर एकनाथ शिंदे हे किती दबावाखाली काम करत असतील असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली टीका केली आहे. तर यावेळी जयंत पाटील म्हणाले, एकनाथ शिंदे हे फक्त मुखवटा आहेत आणि राज्य देवेंद्र फडणवीसच चालवत असल्याचा निशाणाही त्यांनी केला.

Published on: Mar 28, 2023 09:58 PM