संभाजी भिडे राज्यातील आधुनिक सरडा, कोणी केली जिव्हारी लागणारी टीका?
मराठ्यांना उभा देश चालवायचाय, आरक्षण कुठून काढलं? असे वक्तव्य करत मराठा आरक्षणावरून संभाजी भिडे यांनीच आता युटर्न घेतला आहे. संभाजी भिडे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पलटी मारल्यानंतर सचिन खरात यांनी त्यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली आहे. बघा काय म्हणाले?
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे राज्यात आंदोलन करत आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन आरक्षणाला पाठिंबा दिला होता, मात्र याच संभाजी भिडे यांनी आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून यु-टर्न घेतला आहे. मराठा म्हणजे वाघ आणि सिंह… आरक्षण कुठे घेऊन बसलात? असा सवाल संभाजी भिडे यांनी केला आहे. तर मराठ्यांना उभा देश चालवायचाय, आरक्षण कुठून काढलं? असे वक्तव्य करत मराठा आरक्षणावरून संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणावरून पलटी मारली आहे. यावरून राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते सचिन खरात यांनी संभाजी भिडे यांच्यावर टीका केली आहे. संभाजी भिडे हे गृहस्थ आरक्षणविरोधी आणि बहुजनविरोधी आहेत. संभाजी भिडे हे आधुनिक सरडा आहेत त्यामुळे ते वेळोवेळी त्यांच्या गरजेनुसार रंग बदलत असतात, असे म्हणत सचिन खरात यांनी जिव्हारी लागणारी टीका केली आहे.