‘महाराष्ट्रात फिरणं कठीण होईल’, गोपीचंद पडळकर यांना कुणाचा इशारा?
VIDEO | भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक, का केली तक्रार दाखल?
मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील माता रमाबाई पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात तक्रार केली आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज चव्हाण म्हणाले की, गोपीचंद पडळकर यांनी इंदापूरच्या सभेमध्ये पवार ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. ती कीड मुळासकट उपटावी लागेल, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे राज्याभरातील पवार नावाच्या लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. म्हणून गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात येत आहे. तर गोपीचंद पडळकरांना महाराष्ट्रात फिरणं कठीण होईल, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पडळकरांना त्यांची जागा दाखवेल, असा इशाराच राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांनी पडळकरांना दिला आहे.