नवी मुंबईतील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून गोळी झाडून मुलाची हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद
काल (सोमवारी) संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भगवान पाटीलने मुलांवर गोळीबार केला होता. जखमी अवस्थेत दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल केले होते, परंतु गंभीर जखमी झालेला मोठा मुलगा विजय पाटीलचे इंद्रावती रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. तर जखमी सुजयवर उपचार सुरु आहेत. | Navi Mumbai Crime News Retired Police Officer Bhagwan Patil Shot Sons
निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने मुलांवर केलेल्या गोळीबाराचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. गाडीच्या सर्व्हिसिंगच्या पैशांवरुन बाप-लेकामध्ये वाद झाला होता. त्यानंतर संतापाच्या भरात भगवान पाटीलने मुलांवर गोळीबार केल्याचा आरोप आहे. मोठा मुलगा विजय पाटीलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर धाकटा मुलगा सुजय पाटील जखमी आहे. निवृत्त पोलीस अधिकारी भगवान पाटीलने गुन्हा मान्य केला आहे. काल (सोमवारी) संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भगवान पाटीलने मुलांवर गोळीबार केला होता. जखमी अवस्थेत दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल केले होते, परंतु गंभीर जखमी झालेला मोठा मुलगा विजय पाटीलचे इंद्रावती रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. तर जखमी सुजयवर उपचार सुरु आहेत. | Navi Mumbai Crime News Retired Police Officer Bhagwan Patil Shot Sons
Latest Videos