उरणमधील यशश्री शिंदे निर्घृण हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट, आता 'या' तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री

उरणमधील यशश्री शिंदे निर्घृण हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट, आता ‘या’ तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री

| Updated on: Jul 30, 2024 | 12:25 PM

यशश्री शिंदे या 22 वर्षीय तरुणीचा रायगड जिल्ह्याच्या उरणमध्ये हत्या झाली होती. शुक्रवारी रात्री उरण-पनवेल रेल्वे मार्गालगत तिचा मृतदेह सापडला होता. तिचे अवयव कापून ही हत्या करण्यात आली होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता. यशश्रीवर अंत्यसंस्कारही करण्यात आले.

उरणमधील यशश्री शिंदे निर्घृण हत्याकांड प्रकरणात मोठी आणि नवी अपडेट समोर आली आहे. नवी मुंबई पोलिसांकडून कर्नाटकातील तरूणाची चौकशी सुरू झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मोहसीन नावाच्या तरूणाची कर्नाटकात पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. मृत यशश्री शिंदेंच्या हत्येशी संबंध असल्याने मोहसीन या तरूणाची सध्या चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, यशश्री शिंदे या 22 वर्षीय तरुणीचा रायगड जिल्ह्याच्या उरणमध्ये हत्या झाली होती. शुक्रवारी रात्री उरण-पनवेल रेल्वे मार्गालगत तिचा मृतदेह सापडला होता. तिचे अवयव कापून ही हत्या करण्यात आली होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता. यशश्रीवर अंत्यसंस्कारही करण्यात आले. यानंतर मृत यशश्री शिंदेंचा शवविच्छेदन अहवाल काल समोर आला. यामध्ये तिच्यावार कोणताही अत्याचार झाला नसून आरोपीने हत्येच्या उद्देशानेच तरूणीवर वार केल्याची माहिती आहे. मुंबई पोलिसांनी आरोपी दाऊदच्या कर्नाटकातील गुलबर्गा येथे मुसक्या आवळल्या आहेत.

Published on: Jul 30, 2024 12:22 PM