VIDEO : Rana दाम्पत्याला कोर्टाकडून दिलासा नाही, 29 एप्रिला होणार पुढील सुनावणी

VIDEO : Rana दाम्पत्याला कोर्टाकडून दिलासा नाही, 29 एप्रिला होणार पुढील सुनावणी

| Updated on: Apr 26, 2022 | 1:30 PM

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना आजही दिलासा मिळाला नाही. राणा दाम्पत्यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी करण्यास सत्रं न्यायालयाने नकार दिला. येत्या 29 तारखेला खार पोलिसांनी दाम्पत्यांच्या आरोपावर सविस्तर निवेदन सादर करण्याचे आदेश देत सत्र न्यायालयाने पुढील सुनावणी 29 एप्रिल रोजी ठेवली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्यांना येत्या 29 एप्रिलपर्यंत कोठडीत राहावं लागणार आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना आजही दिलासा मिळाला नाही. राणा दाम्पत्यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी करण्यास सत्रं न्यायालयाने नकार दिला. येत्या 29 तारखेला खार पोलिसांनी दाम्पत्यांच्या आरोपावर सविस्तर निवेदन सादर करण्याचे आदेश देत सत्र न्यायालयाने पुढील सुनावणी 29 एप्रिल रोजी ठेवली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्यांना येत्या 29 एप्रिलपर्यंत कोठडीत राहावं लागणार आहे. येत्या 29 एप्रिल रोजी राणा दाम्पत्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार असल्याने त्यांना जामीन मिळतो का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत अपशब्द वापरल्याबद्दल आणि दोन समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य केल्याबद्दल राणा दाम्पत्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती.