‘आळसी ऑफ द इयर’ पहायचा असेल तर मातोश्रीवर जा, नवनीत राणांचे ते शब्द काय?

नवनीत राणा आज दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. मतदार संघाच्या कामासाठी मी जाणार असल्याची माहिती नवनीत राणा यांनी दिली.

'आळसी ऑफ द इयर' पहायचा असेल तर मातोश्रीवर जा, नवनीत राणांचे ते शब्द काय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 04, 2022 | 11:09 AM

स्वप्निल उमप, अमरावतीः तुम्हाला सर्वात आळशी माणूस पहायचा असेल तर तुम्ही मातोश्रीवर जाऊ शकता, असा सल्ला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी दिला आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांच्या एका वक्तव्यानंतर नवनीत राणांनी हे प्रत्युत्तर दिलंय. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या कार्यशैलीवर सुषमा अंधारे यांनी टीका केली होती. यावर प्रतिक्रिया देताना नवनीत राणांनी त्यांना सर्वात आळशी माणूस पहायला तुम्ही मातोश्रीवर जाऊ शकता, या जहरी शब्दात टीका केली.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नवनीत राणा यांनी वारंवार तीव्र शब्दात टीका केली आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना सर्वात आळशी माणूस असं संबोधलंय.

अमरावतीत टीव्ही9 शी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, ‘ मी त्यांना (सुषमा अंधारेंना) ओळखत नाही. ती महिला अॅक्टिंग करते. ज्या पद्धतीने त्या बोलतात, त्यांनी काल मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली, ती चुकीची आहे. त्यांना जर आळशी माणूस शोधायचा तर त्यांनी मातोश्रीवर जावं. आडशी माणूस, आडशी व्यक्ती ऑफ द इयर आणि पाच वर्षांतला आडशी माणूस शोधायचा असेल तर त्यांच्याच पार्टीचा अध्यक्ष आहे. त्यांना जाऊन ते शोधू शकतात, असा सल्ला नवनीत राणा यांनी दिला.

पाहा नवनीत राणा काय म्हणाल्या?

उद्धव ठाकरे त्यांच्या आयुष्यात 56 वर्षात जेवढे फिरले नसती तेवढे देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री गेल्या तीन महिन्यात फिरले आहेत. त्यामुळे आळशी माणूस त्यांना शोधायचा असेल तर त्यांना मातोश्रीच्या साइडला जावं..

नवनीत राणा आज दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. मतदार संघाच्या कामासाठी मी जाणार असल्याची माहिती नवनीत राणा यांनी दिली.

आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद आता मिटला आहे. या दोघंही आता विकासाच्या मुद्द्यावर लक्ष देतील. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे गेल्या तीन महिन्यात ज्या झपाट्याने काम करत आहेत, त्यांच्याकडून अनेकांनी शिकलं पाहिजे, असं वक्तव्य नवनीत राणा यांनी यावेळी केलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.