Shivsena VS Rana Couple : राणा दाम्पत्यानं मुख्यमंत्री, संजय राऊत आणि अनिल परब यांच्याविरोधात तक्रार दाखल
राणा दाम्पत्यानं मुख्यमंत्री, संजय राऊत आणि अनिल परब यांच्याविरोधात तक्रार
मुंबई: हनुमान चालीसावरुन (hanuman chalisa) सुरु झालेल्या राजकारणाचा आणखी एक अंक आता खार पोलीस ठाण्यात घडलाय. तो म्हणजे खासदार नवनीत राणा (navneet rana) आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) , शिवसेना नेते संजय राऊत, आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात तक्रार दाखल केलीय. त्यासोबत 500 ते 600 शिवसैनिकांविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. ती तक्रार खार पोलीसांनी दाखलही करुन घेतलीय. तसा फोटो खुद्द राणांकडून प्रसारित करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस मुख्यमंत्र्यासह राऊत, परब आणि शिवसैनिकांविरोधात काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक करण्यात आली आहे.

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'

पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?

'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?

पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
