“बाळासाहेबांचा विचार जिवंत ठेवायचा असेल, तर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसोबत यावं”
खासदार नवनीत राणा यांनी निवडणूक आयोगाच्या कालच्या निर्णयावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. त्या काय म्हणाल्या आहेत? पाहा...
अमरावती : खासदार नवनीत राणा यांनी निवडणूक आयोगाच्या कालच्या निर्णयावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. महाशिवरात्रीच्या निमित्ताने शंकर भगवानजींनी उद्धव ठाकरेंना चांगला प्रसाद दिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार जिवंत ठेवावा, असं वाटत असेल तर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत यायला पाहिजे, असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत. तळागाळातून इथपर्यंत शिवसेनेला पोहोचवण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ज्यांच्याकडे बहुमत आहे, ज्यांच्याकडे विचारधारा आहे त्यांच्या बाजूने हा निर्णय लागला. त्यामुळे आगामी काळात शिवसेना भवन ही एकनाथ शिंदेंना मिळेल, असंही नवनीत राणा म्हणाल्या आहेत.
Published on: Feb 18, 2023 02:39 PM
Latest Videos