नवनवीन राणा खेळल्या कबड्डी

नवनवीन राणा खेळल्या कबड्डी

| Updated on: Mar 08, 2022 | 9:38 AM

नवनीत राणांनी जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात आयोजित केलेल्या महिलांच्या खो-खो स्पर्धेत भाग घेतला. न

खासदार नवनवीन राणा (MP Navneet Rana) या नेहमी या न त्या कारणांवरुन चर्चेत असतात. खासदार राणा या कधी क्रिकेटच्या मैदानात तर कधी हॉलीबॉल स्पर्धेत सहभाग घेतात, तर कधी नवरात्री उत्सव असो वा मेळघाटमधील होळीचे आदिवासी नृत्य असो नवनीत राणा कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेच्या केंद्रस्तानी असतात. राजकारणाबरोबरच त्या मैदानी खेळामुळे देखील अनेकदा चर्चत आल्या आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी मैदानी खेळ खेळून उपस्थितांची मने जिंकली. नवनीत राणांनी जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात आयोजित केलेल्या महिलांच्या खो-खो स्पर्धेत भाग घेतला. नवनवीत राणा नुसत्या भाग घेऊनच थांबल्या नाहीत तर त्यांनी खो-खो (Kho Kho) स्पर्धेत प्रथम पारितोषिक देखील पटकावले आहे. खासदार नवनीत राणांचा खो-खो स्पर्धेतील हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे.