रवीजींचं नाव घेते झुकेंगा नही… हळदी कुंकूच्या कार्यक्रमात नवनीत राणांनी घेतला खास उखाणा
अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे राणा दाम्पत्याने सामूहिक हळदी कुंकुचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी या कार्यक्रमात आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा सुद्धा उपस्थित होते. यावेळी रवी राणांसाठी नवनीत राणा यांनी घेतला खास उखाणा
अमरावती, १२ फेब्रुवारी २०२४ : नागपुरात भारतीय जानता पक्षाचा महिला आघाडीच्यावतीने दक्षिण-पश्चिम मंडळाकडून विकासाचे वान हळदी कुंकू या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले होते. यावेळी उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कार्यक्रमात महिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महिलांच्या आग्रहास्तव एक उखाणाही घेतला आणि त्याची चांगलीच चर्चा झाली. आता नवनीत राणा यांच्या उखाण्याची चर्चा होतेय. अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे राणा दाम्पत्याने सामूहिक हळदी कुंकुचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी या कार्यक्रमात आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा सुद्धा उपस्थित होते. यावेळी रवी राणा मंचावर बसले असतांना नवनीत राणा यांनी उखाणा घेतला. 37 जोडप्यात सामूहिक विवाह सोहळ्यात झाले माझे लग्न… आणि लग्नात आणला होता बँडवाला रवीजी नाव घेते झुकेंगा नही मै साला…