“असदुद्दीन ओवेसी यांनी लक्षात ठेवावं हे ठाकरेंचं सरकार नाही”, नवनीत राणा यांचा इशारा
एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीने ओवेसी यांच्या बुलढाण्यातील सभेत औरंगाजेबाच्या नावाने कथित घोषणाबाजी केल्याचं म्हटलं जात आहे. यावर विविध खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली असून या घोषणाबाजीचा निषेध केला आहे.
अमरावती: एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीने ओवेसी यांच्या बुलढाण्यातील सभेत औरंगाजेबाच्या नावाने कथित घोषणाबाजी केल्याचं म्हटलं जात आहे. यावर विविध खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली असून या घोषणाबाजीचा निषेध केला आहे.”मागील काही दिवसांपासून असदुद्दीन ओवेसी सातत्याने महाराष्ट्रात येत आहेत. ते कधी औरंगजेबाच्या नावानं घोषणा देतात, तर कधी व्यासपीठावर उभं राहून भडकाऊ भाषणं देतात. पण ओवैसी यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी, आता महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचं सरकार नाही. जिथे तुमच्या घोषणा किंवा भडकाऊ भाषणं ऐकून घेतली जातील. त्यामुळे ओवेसींनी आपल्या मर्यादेत राहावं. ती मर्यादा पार करण्याचा प्रयत्न करू नये,” असा इशारा नवनीत राणा यांनी दिला.
Published on: Jun 26, 2023 04:48 PM
Latest Videos