Navneet Rana Garba : नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवरात्रौत्सव मुख्य आकर्षण असते ते म्हणजे रास गरबा आणि दांडिया नाईट्स कार्यक्रमांचे.... अमरावती शहरात देखील विविध ठिकाणी गरबा नृत्य, गरबा दांडियाचं आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये माजी खासदार नवनीत राणा यांनी देखील गरबा खेळण्याचा आनंद लुटला
नवरात्रौत्सव सुरू होताच सर्वत्र दांडिया आणि रास गरब्याचा उत्साह पाहायला मिळतो. सध्या ठिकठिकाणी दांडिया नाईट्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. सर्वच जणांमध्ये हा उत्साह पाहायला मिळत आहे. गरब्याची गाणी ऐकताय प्रत्येकाची पाऊलं थिरकल्याशिवाय राहत नाही. अशातच चर्चेत असलेल्या माजी खासदार नवनीत राणा यांनाही स्वत:ला रोखता आले नाही. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये नवनीत राणा गरबा करताना दिसत आहेत. त्याच्या डान्स मूव्ह्स पाहून सगळेच हैराण झाले आहेत. अमरावती शहरात विविध ठिकाणी गरबा नृत्य, गरबा दांडियाचं आयोजन केल जातं. नवरात्र उत्सवाच्या गरब्यामध्ये माजी खासदार नवनीत राणा यांनी तरुणींसोबत गरबा खेळण्याचा आनंद लुटल्याचे पाहायला मिळाले. खासदार नवनीत राणा यांनी देवी माँ चे दर्शन घेऊन भाविकांसोबत गरबा खेळला. नवरात्रौत्सव अमरावती शहर आणि जिल्हातील सार्वजनिक दुर्गोत्सव, शारदा उत्सव मंडऴाला भेट देऊन नवनीत राणा यांनी देवी दर्शना नंतर भाविकांसोबत गरबा नृत्य केल्याचे देखील पाहायला मिळाले.