Dombivali मध्ये Navy कर्मचाऱ्याला माहाण करत लुबाडले, संपुर्ण घटना CCTV मध्ये कैद
तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी संबंधित सीसीटीव्ही फुटेजेच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला व अवघ्या काही तासांमध्येच चोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. सुदर्शन पटेल आणि अमित वागरे असे या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत.
ठाणे : डोंबिवलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. रात्रीच्या सुमारास घराकडे परतणाऱ्या एका नेव्ही कर्मचाऱ्याला मारहाण करत त्याच्याजवळील मोबाईल (Mobile theft) हिसकावून दोन आरोपींनी पोबारा केला होता. डोंबिवली पूर्वमध्ये (Dombivli East) ही घटना घडली होती. ही मारहाणीची घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली. या प्रकरणी डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी संबंधित सीसीटीव्ही फुटेजेच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला व अवघ्या काही तासांमध्येच चोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. सुदर्शन पटेल आणि अमित वागरे असे या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. परवा रात्री साडेअकराच्या दरम्यान ही घटना घडली होती.
Latest Videos