सहआरोपींनी घेऊन मलिकांचा तपास कराः अमित देसाई
नवाब मलिकांचा आणि डी गँगचा काडीमात्र संबंध नाही असे सांगत, या प्रकरणातील सहआरोपींना घेऊन मलिकांचा तपास करा असा जोरदार युक्तिवाद अमित देसाई यांनी केला.
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे वकील अमित देसाई यांनी न्यायालयात जोरदार युक्तीवाद केला. नवाब मलिकांचा आणि डी गँगचा काडीमात्र संबंध नाही असे सांगत, या प्रकरणातील सहआरोपींना घेऊन मलिकांचा तपास करा असा जोरदार युक्तिवाद अमित देसाई यांनी केला. 2017 आणि 2019 या काळातील ईडीकडून झालेल्या कारवाईचा आधार घेत त्यांनी सांगितले की, सलीम पटेल आणि सलीम फ्रूट या नावासंदर्भात न्यायालयात संभ्रम झाल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांचा जो जमिनीचा व्यवहार झाला आहे तो सलीम पटेल याच्याशी झाला आहे. सलीम फ्रूट याचा आणि मलिक यांचा काहीही संबंध नाही असेही त्यांनी सांगितले. सलीम फ्रूट हा छोटा शकीलचा नातेवाईक असल्याचे सांगून मलिकांचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही असे सांगत या प्रकरणातील सहआरोपींना घेऊन तपास यंत्रणेने तपास करावा असा युक्तिवाज केला.