Nawab Malik PC : ना NCB चा अधिकारी होता, ना ड्रग्ज सापडलं, आर्यन खान प्रकरणात मलिकांचे गौप्यस्फोट
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणात कुठलंही ड्रग्ज सापडलेलं नाही, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणात कुठलंही ड्रग्ज सापडलेलं नाही, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. भाजप हे बॉलिवूड आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे, आर्यन खानसोबत व्हायरल झालेल्या फोटोत दिसणाऱ्या मनिष भानुशाली याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतही फोटो आहेत. त्यामुळे एनसीबीनं सांगावं त्यांचा आणि भानुशालीचा संबंध काय? असा सवाल मलिक यांनी विचारला आहे. “एनसीबीनं कारवाई केली, त्या कारवाईत एक व्यक्ती आर्यन खानला घेऊ जात आहे, असं दिसतं. त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यात आला आहे. सेल्फी व्हायरला झाला, तो एनसीबीचा अधिकारी नाही” असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. तो व्यक्ती एनसीबीचा नाही, मग नक्की कोण आहे, याचे एनसीबीला उत्तर द्यावं लागेल. मनिष भानुशाली हा व्यक्ती आरोपींना घेऊन जात आहे. त्याच्या प्रोफाईलवर भाजपचे उपाध्यक्ष असा उल्लेख आहे. त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह काही भाजप नेत्यांबरोबर फोटो आहेत. एनसीबीने सांगावं त्यांचा आणि मनिष भानुशालीचा संबंध काय?” असंही नवाब मलिक म्हणाले.