Nawab Malik | आष्टीत 10 देवस्थानाच्या जमिनी लाटल्याचा घोटाळा, मलिकांचा सुरेश धसांवर अप्रत्यक्ष वार
आष्टीत मंदिर आणि मशिदीच्या जमिनी लाटण्यात आल्या आहेत. भाजपचे आमदार सुरेश धस आणि आष्टीचे माजी आमदार दोंदे यांच्याविरोधात राम खाडे यांनी ईडीकडे तक्रार केली आहे.
मुंबई: आष्टीत मंदिर आणि मशिदीच्या जमिनी लाटण्यात आल्या आहेत. भाजपचे आमदार सुरेश धस आणि आष्टीचे माजी आमदार दोंदे यांच्याविरोधात राम खाडे यांनी ईडीकडे तक्रार केली आहे. ईडीने या प्रकरणाचा तपास करून संबंधितांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे. तसेच, जो भाजप प्रभू रामचंद्राचे नाव घेऊन राजकारण करत आहे. त्याच भाजपचे नेते राज्यात प्रभू रामांच्या मंदिराच्या जमिनी हडपत आहे, असा घणाघाती हल्लाही मलिक यांनी केला. या प्रकरणी बोर्डाकडून 11 एफआयआर दाखल केल्या आहेत अशी माहिती देखील त्यांनी दिली .
Latest Videos