Nawab Malik यांचा D गॅंगशी काहीही संबध नाही – Adv . Amit Desai

| Updated on: Feb 23, 2022 | 7:38 PM

मलिक यांच्या अटकेनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अटकेनंतर मलिक यांना कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी ईडीने मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केलाय. तर मलिक यांच्या वकिलांनी हा आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न करत मलिक हेच पीडित असल्याचं म्हटलंय.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मलिक यांच्या अटकेनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अटकेनंतर मलिक यांना कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी ईडीने मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी (Dawood Ibrahim) संबंध असल्याचा गंभीर आरोप केलाय. तर मलिक यांच्या वकिलांनी हा आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न करत मलिक हेच पीडित असल्याचं म्हटलंय. त्यामुळे हे प्रकरण अधिक खोलवर जाऊन समजून घेणं गरजेचं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे प्रकरण माध्यमांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला होता.