Special Report | कारवाई पोरावर, भुर्दंड बापाला?

Special Report | कारवाई पोरावर, भुर्दंड बापाला?

| Updated on: Oct 09, 2021 | 9:50 PM

राष्ट्रवादीचे नेते आणि मंंत्री नवाब मलिक यांनी आतापर्यंत तीन पत्रकार परिषदा घेऊन एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करुन कारवाई आणि आतापर्यंतच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे

मुंबईतल्या हायप्रोफाईल ड्रग्जकांडातही आता केंद्र विरुद्ध ठाकरे सरकार असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. कारण आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाची चौकशी आतापर्यंत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे होती. परंतु राष्ट्रवादीचे नेते आणि मंंत्री नवाब मलिक यांनी आतापर्यंत तीन पत्रकार परिषदा घेऊन एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करुन कारवाई आणि आतापर्यंतच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली. त्यामुळे आता केंद्रीय तपास यंत्रणेकडे या प्रकरणाची चौकशी असताना मुंबई पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी मलिक यांनी केल्याने केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार, अशा वादाची शक्यता निर्माण झाली आहे.

Published on: Oct 09, 2021 09:48 PM