देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना होस्टेज चालवलं, नवाब मलिकांचा आरोप
तुम्ही अंडरवर्ल्डचा खेळ सुरु केला आहे. मी आज बोलणार नाही. उद्या देवेंद्र फडणवीस यांचा अंडरवर्ल्डचा काय खेळ महाराष्ट्रात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना शहरात होस्टेज बनवलं होतं याचा उद्या 10 वाजता भांडाफोड करणार आहे, असं नवाब मलिक म्हणाले.
तुम्ही अंडरवर्ल्डचा खेळ सुरु केला आहे. मी आज बोलणार नाही. उद्या देवेंद्र फडणवीस यांचा अंडरवर्ल्डचा काय खेळ महाराष्ट्रात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना शहरात होस्टेज बनवलं होतं याचा उद्या 10 वाजता भांडाफोड करणार आहे, असं नवाब मलिक म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टी वाढवून सांगण्याचा प्रयत्न केला. 62 वर्षात कोणीही आरोप करु शकलं नाही. कोणत्याही यंत्रणेसमोर जायचंय ते जावा. माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी जे करायचंय ते करा. सरकारी दप्तरात त्याची नोंद आहे. झुठ बोलो जरा ढंग से बोलो, असा टोला नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. देवेंद्र फडणवीस तुम्ही अंडरवर्ल्डचा मुद्दा पुढं आणलाय तर मी उद्या सकाळी अंडरवर्ल्डचा हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे, असं नवाब मलिक म्हणाले.
Latest Videos