Nawab Malik | व्हिलन तुरुंगात जात नाही, तोपर्यंत पिक्चर सुरुच राहणार : नवाब मलिक
नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ड्रग्ज प्रकरणाचा आणखी भांडाफोड केला. हे काही मेरा नाम जोकर आणि संगम या दोन इंटरव्हलचे पिक्चर नाहीयेत. जोपर्यंत व्हिलन आत जात नाही तोपर्यंत पिक्चर संपणार नाही, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.
सध्या जो खेळ सुरू आहे, तो काही मेरा नाम जोकर किंवा संगम या दोन चित्रपटांचे इंटरव्हल नाहीत. जोपर्यंत व्हिलन आत जात नाही, तोपर्यंत पिक्चर संपणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिला आहे. नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ड्रग्ज प्रकरणाचा आणखी भांडाफोड केला. हे काही मेरा नाम जोकर आणि संगम या दोन इंटरव्हलचे पिक्चर नाहीयेत. जोपर्यंत व्हिलन आत जात नाही तोपर्यंत पिक्चर संपणार नाही. ललित हॉटेल सात महिने बुक होती. तिथूनच प्रायव्हेट आर्मी तिथून काम करत होती. विलास भानुशाली, धवल भानुशाली, सॅम डिसूजा अनेक लोक येत होते. तिथे मुलीही येत होत्या. तिथे ड्रग्जही घेतलं जात होतं. ललितमध्ये शबाब आणि कबाब सुरू होते. फक्त नवाब नव्हता. हे सर्व तुमचेच लोक होते. वानखेडेच्या प्रवक्त्यानेच ती माहिती दिली, असं मलिक म्हणाले.
Latest Videos