Nawab Malik LIVE | राज्यपालांकडून सत्तेची 2 केंद्र बनवण्याचा प्रयत्न - मंत्री नवाब मलिकांचा आरोप

Nawab Malik LIVE | राज्यपालांकडून सत्तेची 2 केंद्र बनवण्याचा प्रयत्न – मंत्री नवाब मलिकांचा आरोप

| Updated on: Aug 03, 2021 | 3:20 PM

राज्यपाल कोश्यारी यांच्या नांदेड दौऱ्यात ते राज्य सरकारनं केलेल्या कामांचं उद्धाटन करणार असून यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

महाविकास आघाडी सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर राज्यात सत्तेची दोन केंद्र बनवत असल्याचा आरोप केला आहे. राज्यपाल कोश्यारी यांचा 5 तारखेला नांदेड दौरा नियोजित आहे. या दौऱ्यात ते राज्य सरकारनं केलेल्या कामांचं उद्धाटन करणार आहे, हे गैर असल्याचे सांगत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. याबाबत राज्याचे मुख्य सचिव राज्यपालांच्या सचिवांशी चर्चा करुन हा कार्यक्रमात बदल करतील अशी अपेक्षा अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केली.