देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यावर IAS-IPS अधिकारी मंत्र्यांवर आरोप करतात, नवाब मलिकांचा गंभीर आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील काही अधिकाऱ्यांवर धक्कादायक आरोप केले आहेत. या देशामध्ये भाजपचं केंद्राचं सरकार विविध राज्यात विरोधकांचं सरकार आहे तिथे त्या सरकारला आणि नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी कट कारस्थान रचत आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील काही अधिकाऱ्यांवर धक्कादायक आरोप केले आहेत. या देशामध्ये भाजपचं केंद्राचं सरकार विविध राज्यात विरोधकांचं सरकार आहे तिथे त्या सरकारला आणि नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी कट कारस्थान रचत आहे. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात हे सुरु आहे. अनिल देशमुख, अनिल परब आणि भावना गवळी यांच्यावर राजकीय हेतून कारवाई करण्यात येत आहे. सगळं कटकारस्थान सुरु आहे हे आम्हाला माहिती आहे. जे आयपीएस आणि आयएएस अधिकारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटतात. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आरोप करतात. जे आयपीएएस आणि आयएएस अधिकाऱ्यांच्या केंद्रातील मंत्र्यांसोबत बैठक झाली. या देशातील संस्था ईडी आणि सीबीआय यांचा राजकीय वापर होतोय. विनाकारण कुठल्याही राजकीय नेत्यांना आणि राजकीय पक्षांना ठरवून टारगेट करण्याचं सुरु राहिलं तर जनता यांना उत्तर देईल, पश्चिम बंगालच्या निवडणुकीत हे दिसून आलं आहे, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.