फोन टॅपिंग प्रकरण, देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना नवाब मलिक यांचं प्रत्युत्तर

फोन टॅपिंग प्रकरण, देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना नवाब मलिक यांचं प्रत्युत्तर

| Updated on: Jul 20, 2021 | 4:47 PM

केंद्र सरकारने या प्रकरणी कारवाई करावी. नुसतं देशाला बदनाम करण्याचा कट आहे असा दावा करू नये, असा टोला मलिक यांनी लगावला.

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्हे तर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारच्या काळातही फोन टॅपिगं झाली होती, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पलटवार केला आहे. नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलं आहे. मनमोहन सिंग यांच्या काळातही फोन टॅपिंग झाल्याचा दावा भाजप करत आहे. पण मनमोहन सिंग यांच्या काळात झालं तेव्हा त्यांनी ज्यांनी हे प्रकार केले त्यांच्यावर कारवाईही केली. आता केंद्र सरकारने या प्रकरणी कारवाई करावी. नुसतं देशाला बदनाम करण्याचा कट आहे असा दावा करू नये, असा टोला मलिक यांनी लगावला.