Special Report | समीर वानखेडे यांचं सत्यनारायण VS नवाब मलिक यांचा निकाहनामा
मलिक यांच्या कन्या निलोफर मलिक खान आणि सना मलिक शेख यांनी देखील काल वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाशी संबंधित विवाहाचा दाखला आणि लग्नाच्या स्वागत सोहळ्याची निमंत्रण पत्रिका पोस्ट केली होती.
मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा आरोप मलिक सातत्याने करत आहेत. त्यासदर्भातील काही पुरावे देखील त्यांनी सादर केले होते. मात्र आता पुन्हा एकदा मलिक यांनी समीर वानखेडे यांचा एक फोटो पोस्ट केला आहे. ज्या फोटोमध्ये समीर वानखेडे हे निकाह करारनाम्यावर सही करताना दिसत आहेत. दरम्यान मलिक यांच्या कन्या निलोफर मलिक खान आणि सना मलिक शेख यांनी देखील काल वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाशी संबंधित विवाहाचा दाखला आणि लग्नाच्या स्वागत सोहळ्याची निमंत्रण पत्रिका पोस्ट केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा मलिक यांनी हा फोटो पोस्ट केला आहे.
Latest Videos