नवाब मलिक अजित पवार यांच्यासोबत? स्वातंत्र्यदिनाच्या 'त्या' पोस्टमळे चर्चांना उधान

नवाब मलिक अजित पवार यांच्यासोबत? स्वातंत्र्यदिनाच्या ‘त्या’ पोस्टमळे चर्चांना उधान

| Updated on: Aug 15, 2024 | 5:23 PM

नवाब मलिक जामिनावर तुरूंगातून बाहेर आले तेव्हा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी त्यांच्यासोबत भेटीगाठी घेतल्याचे पाहायला मिळाले होते. पण, नवाब मलिक कुठे जाणार हे मात्र स्पष्ट होत नव्हतं. दरम्यान, नवाब मलिक अजित पवार यांच्यासोबत असल्याचे समोर आले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं सोशल मीडियावर नवाब मलिक यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.

नवाब मलिकांनी सोशल मीडियावर दिलेल्या शुभेच्छांवरून मोठा वाद होण्याची चिन्ह आहेत. कारण नवाब मलिक यांनी आपल्या ट्वीटर हँडल वरून शुभेच्छा देताना आपल्या फोटोसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह घड्याळ फोटोमध्ये वापरल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. इतकंच नाहीतर मलिक हे अजित पवारांसोबत असल्याची चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या ज्या बैठका झाल्या त्यामध्ये नवाब मलिक दिसत होते. विधानपरिषदेची निवडणूक होती त्यावेळी नवाब मलिक अजित पवारांसोबत दिसले होते. मात्र असे असले तरी जर नवाब मलिक हे अजित पवार यांच्यासोबत गेले तर भाजप आणि अजित पवार गट यांच्यात मोठा वाद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Published on: Aug 15, 2024 05:23 PM