फडणवीसांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात बनावट नोटांचे रॅकेट – मलिक
नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. नोटबंदीनंतर महाराष्ट्रात फडणवीसांच्या आशीर्वादाने बनावट नोटांचे रॅकेट सुरू होते, असे मलिक यांनी म्हटले आहे.
मुंबई – नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. देशात जेव्हा नोटबंदी झाली, त्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी बनावट नोटा आढळून आल्या. तामिळनाडू आणि पंजाबमध्ये कारवाई करण्यात आली. मात्र महाराष्ट्र एकही बनावट नोट आढळून आली नाही, ना कोणाविरोधात कारवाई करण्यात आली. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे महाराष्ट्रात फडणवीसांच्या आशीर्वादाने बनावट नोटांचे रॅकेट सुरू होते, असे मलिक यांनी म्हटले आहे. ते आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
Latest Videos