ईडीच्या कारवाईवरुन सुधीर मुनगंटीवारांचं अमोल मटकरींच्या आरोपांना प्रत्युत्तर, फोनवरुनच जुगलबंदी!
राष्ट्रावादीचे अमोल मिटकरी यांनी भाजपवर हल्लाबोल केला होती. केंद्रीय तपास यंत्रणांवरुन त्यांनी केलेल्या आरोपांना भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी प्रत्युत्तर दिलंय. टीव्ही 9 मराठीशी फोनवरुन संवाद साधताना आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.
राष्ट्रावादीचे अमोल मिटकरी यांनी भाजपवर हल्लाबोल केला होती. केंद्रीय तपास यंत्रणांवरुन त्यांनी केलेल्या आरोपांना भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी प्रत्युत्तर दिलंय. टीव्ही 9 मराठीशी फोनवरुन संवाद साधताना आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. ED, CBI या केंद्रिय यंत्रणांचा कशाप्रकारे गैरवापर सुरू आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. नवाब मलिक तिथे जातील, उत्तरे देतील, परत येतील आणि पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होतील, असं मिटकरी यांनी म्हटलंय. 24 तास नवाबभाई मीडियावर असतात, सरकारची प्रखरपणे बाजू मांडातात. आणि प्रश्न महाराष्ट्राची चिंता मुनगंटीवारांना आहे हे पाहूण आनंद वाटला, मात्र महाराष्ट्राला कोण बदनाम करत आहे हे सगळ्यांना माहीत आहे, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय. तर अमोल मिटकरींच्या यंत्रणांचा गैरवापर आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याच्या वक्तव्यावर मुनगंटीवार म्हणतात, नवाब मलिक म्हणजे महाराष्ट्र ही कल्पना दुषित आहे, अशा शब्दांत मुनगंटीवारांनी प्रत्युत्तर दिलंय. बुधवारी सकाळी ईडी अधिकाऱ्यांनी नवाब मलिक यांच्या घरी धडक दिली होती. पहाटे अधिकारी मलिकांच्या घरी दाखल झाले होते. त्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी आणण्यात आलं होतं.