Nagpur | गडचिरोली आणि गोंदियाच्या जंगलात नक्षलवाद्यांकडून ड्रोनचा वापर, पोलीस उपमहानिरीक्षक माहिती

Nagpur | गडचिरोली आणि गोंदियाच्या जंगलात नक्षलवाद्यांकडून ड्रोनचा वापर, पोलीस उपमहानिरीक्षक माहिती

| Updated on: Jul 30, 2021 | 11:40 AM

राज्याच्या पोलीस दलाची चिंता वाढवणारी ही बातमी आहे. कारण दहशतवाद्यांप्रमाणेच आता नक्षलवादीही समाजविघातक कृत्यांसाठी ड्रोनचा वापर करत असल्याची धक्कादायक बाब पुढे आलीय.

राज्याच्या पोलीस दलाची चिंता वाढवणारी ही बातमी आहे. कारण दहशतवाद्यांप्रमाणेच आता नक्षलवादीही समाजविघातक कृत्यांसाठी ड्रोनचा वापर करत असल्याची धक्कादायक बाब पुढे आलीय. काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी जम्मू काश्मिरमध्ये घातपातासाठी ड्रोनचा वापर केला. आता नक्षलवाद्यांकडूनंही ड्रोनचा वापर होत असल्याची बाब, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक संदीप पाटील (Sandip Patil) यांनी मान्य केलीय.

नक्षलवाद्यांकडून ड्रोनचा वापर सुरु, पोलिसांसमोर नवं आव्हान

गडचिरोली आणि गोंदियाच्या घनदाट जंगलात नक्षलवाद्यांकडून ड्रोनचा वापर सुरु झालाय. वर पहाडांवर बसून नक्षलवादी पोलीसांवर निगरानी आणि घातपातासाठी वापरतात ड्रोन वापरतात, पण जंगलात राहणाऱ्या नक्षलवाद्यांना ड्रोन नेमके कुणी पुरवले? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. नागपूरसह, हैदराबादवरुन नक्षलवाद्यांना ड्रोन पुरवठा होत असल्याची माहिती आहे.

(Naxal drone camera Post Surveillance sandip Patil)

Published on: Jul 30, 2021 11:40 AM