लोकसभेच्या चौथ्या टप्प्यानंतर अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
लोकसभेच्या चौथ्या टप्प्यानंतर अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब झालेत. तर दिंडोरीतील सभेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील रोड शो ला देखील अजित पवार हजर राहिले नाहीत. अजित पवार नॉट रिचेबल झाले की राजकीय भूकंप झाल्याचा अनुभव अनेकदा आलाय. यावेळी चौथ्या टप्प्यानंतर अजित पवार महायुतीच्या प्रचारापासून लांब दिसले. यावरून अनेक चर्चा होऊ लागल्यात.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यापासून मतदानापासून अजित पवार महायुतीच्या प्रचारात दिसले नाही. मात्र त्यांची प्रकृती ठीक नव्हती मात्र आता ते पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिसणार अशी माहिती अजित पवार गटाकडून देण्यात आली आहे. लोकसभेच्या चौथ्या टप्प्यानंतर अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब झालेत. तर दिंडोरीतील सभेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील रोड शो ला देखील अजित पवार हजर राहिले नाहीत. दरम्यान, घशाच्या खवखवीमुळे अजित पवार या प्रचारासभांना हजर न राहिल्याची माहिती मिळतेय. अजित पवार नॉट रिचेबल झाले की राजकीय भूकंप झाल्याचा अनुभव अनेकदा आलाय. यावेळी चौथ्या टप्प्यानंतर अजित पवार महायुतीच्या प्रचारापासून लांब दिसले. यावरून अनेक चर्चा होऊ लागल्यात. १३ मेपासून अजित पवार हे राजकीय प्रचारापासून लांब आहेत? १४ मे ला वाराणसी येथे मोदींनी अर्ज भरला त्यावेळी दादा दिसले नाहीत तर त्याच्या ऐवजी प्रफुल्ल पटेल दिसले. १५ मे नाशिक आणि दिंडोरी येथील सभेत ते गैरहजर होते. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.