आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजित पवारांचा निशाणा कुणावर?

आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजित पवारांचा निशाणा कुणावर?

| Updated on: May 01, 2024 | 12:45 PM

जर इतके माझ्यात वाईट गुण होते तर 17- साडे सतरा वर्ष गप्प कशाला बसलात ? असं काय झालंय की आता तुम्हाला हे सगळं दिसायला लागलं? आत्ता माझ्या चुका का दिसत आहेत ? असा सवाल करत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. याच टीकेवर पलटवार करत अजित पवारांनी काय म्हटलं?

पुण्यातील खडकवासला येथील प्रचारसभेत सुप्रिया सुळे यांनी भाजपसह महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. ’17-18 वर्ष आम्ही आम्ही एका संघटनेत काम केलंय. घटस्फोट होऊन सहाच महिने झाले आहेत. पण माझ्यातले असेअसे गुणे लोकं सांगत आहेत, जे मी कधी ऐकलेले पण नाहीत. पण माझा त्यांना एक प्रश्न आहे, जर इतके माझ्यात वाईट गुण होते तर 17- साडे सतरा वर्ष गप्प कशाला बसलात ? असं काय झालंय की आता तुम्हाला हे सगळं दिसायला लागलं? आत्ता माझ्या चुका का दिसत आहेत ? असा सवाल करत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. याच टीकेवर पलटवार करत अजित पवार यांनी पुण्यात महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमातील भाषणानंतर सुप्रिया सुळे यांना एकाच वाक्यात प्रत्युत्तर दिलंय. आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली म्हणून आत्ता सगळ आठवतंय, असं म्हणत अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर देत सुप्रिया सुळे या विषयावर बोलणं टाळल्याचे पाहायला मिळाले. बघा काय म्हणाले अजित पवार?

Published on: May 01, 2024 12:45 PM