'मनसेचा एकच आमदार जर तो दुसरीकडे गेला तर...', अजित पवार यांचा निवडणूक आयोगाला खोचक सवाल

‘मनसेचा एकच आमदार जर तो दुसरीकडे गेला तर…’, अजित पवार यांचा निवडणूक आयोगाला खोचक सवाल

| Updated on: Feb 26, 2023 | 8:57 PM

VIDEO | अजित पवार यांचं निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मिश्किल भाष्य, ... तर मनसेचं नाव आणि चिन्हही जाणार का?

मुंबई : ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना पक्षाचे नाव शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह काढून एकनाथ शिंदे यांना देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय हा पक्षःपातीपणाचा असल्याची भावना लोकांमध्ये असल्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी म्हटले आहे. ४० आमदार आणि काही खासदार एका बाजूला असल्याने त्या गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिल्याचेही त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी मनसे या पक्षाचा पुरावा देत म्हटले उद्या मनसेचा एक आमदार आहे. त्यांनी उद्या पक्षावर दावा केल्यास पक्ष त्यांचा होणार का? असे विचारत अजित पवार यांनी निवडणूक आयोगाला सवाल उपस्थित केला आहे. सोमवारपासून राज्याचे अर्थसंकल्पीय विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होणार असून त्यासंदर्भात विरोधी पक्षांनी आज रणनिती बैठक घेतली, यावेळी नुकताच शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत झालेल्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर त्यांनी निशाणा साधला.

Published on: Feb 26, 2023 08:57 PM