...तर मला पकडा अन् टायरमध्ये घाला; अजित पवार का आणि कुणावर संतापले?

…तर मला पकडा अन् टायरमध्ये घाला; अजित पवार का आणि कुणावर संतापले?

| Updated on: May 22, 2023 | 12:11 PM

VIDEO | 'तुम्हाला तर मी सॅल्यूटच करतो, तुम्ही निवांत पगार घेणार अन्....', अजित पवार यांनी पोलिसांना खोचक टोला लगावत उपटले कान

पुणे : माझी दारूची भट्टी असली तरी मला पकडा आणि टायरमध्ये घाला, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी बारामती तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत थेट प्रतिक्रिया दिली. यावेळी अजित पवार यांनी बारामती पोलिसांना धारेवर धरत त्यांचेही कान उपटले. पाहुणेवाडी येथे रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी पवार यांचे भाषण सुरू असताना पाहुणेवाडी येथील ग्रामस्थांनी त्यांना अवैध धंद्याबाबत पत्र दिले. अजित पवार यांनी हे पत्र सभेत वाचून दाखवले. ते म्हणाले, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार आम्ही येतो दारूच्या भट्ट्या शोधत बसतो. पोलीस निवांत पगार घेतील. तुम्हाला तर मी सॅल्यूटच करतो. मी कितीतरी वेळा सांगतो माझा यामध्ये काही हस्तक्षेप नसतो, असे अजित पवार म्हणाले. ते पुढे म्हणाले, पुढच्या वेळी कोणी पाहुणेवाडीचे मला भेटले तर आवर्जून सांगा की दादा तुम्ही सांगितल्यानंतर पोलिसांनी दारूबंदीसाठी पावले उचलली. उद्या माझी जरी भट्टी सापडली मला पकडा आणि टायर मध्ये घाला, असे पवार म्हणतात सभेमध्ये एकच हशा पिकला.

Published on: May 22, 2023 11:08 AM