Ajit Pawar Group Candidate List : अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, काय आहे वैशिष्ट्य?
NCP Ajit Pawar Group First Candidate List for Maharashtra Eelctions 2024: येत्या विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गट राष्ट्रवादी पक्षाकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. काय आहे यादीचं वैशिष्ट्य
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत ३८ उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत ३८ उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये बारामतीतून स्वतः अजित पवार विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत तर याचबरोबर मंत्री छगन भुजबळ, मंत्री दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे, हसन मुश्रीफ, दिलीप मोहिते पाटील यांना देखील पक्षाकडून तिकीट जाहीर करण्यात आले आहेत. बारामतीमध्ये अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार म्हणजेच काका विरूद्ध पुतण्या लढत होणार आहे. राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत नवाब मलिक, सुनील टिंगरे, बाळासाहेब आजबेंचं नाव नाही. भाजपकडून मलिकांच्या उमेदवारीस विरोध असताना त्यांना उमेदवारी मिळणार की नाही? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. तर वडगाव शेरीच्या उमेदवारीवरून अजूनही सस्पेन्स कायम आहे. पहिल्या यादीमध्ये चार महिलांना आणि २ मुस्लीम उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. यासोबत ३८ उमेदवारांच्या यादीत ५ ओबीसी, ६ एसटी चेहेरे आणि पाच एससी उमेदवारांचा समावेश राष्ट्रवादीने केला आहे. बघा आणखी काय आहेत राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आलेल्या 38 उमेदवारांच्या पहिल्या यादीचे वैशिष्ट्य?